By  
on  

रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं.

यानंतर आता दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिलेली आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला रामराम केला होता. मात्र आता उर्मिलाने शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive