By  
on  

पद्मिनी कोल्हापुरेंच्या लेकाचा थाटात पार पडला साखरपुडा, ही होणार सून

यंदा लॉकडाऊननंतर अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच लग्नाची धूम  पाहायला मिळाली.  अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला. अभिनेता प्रियांक शर्माने निर्माते करीन मोरानी यांची लेक शाझा मोरानीशी साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आहे. प्रियांकची आई पद्मिनी आणि श्रध्दाची आई शिवांगी ह्या सख्ख्या बहिणी आहेत. 

श्रद्धा कपूचा भाऊ सिद्धांतने सोशल मीडियावर आपल्या मावस भावाच्या  साखरपुड्याचे काही फोटो  शेअर करत या जोडप्याला खुप गोड शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

या साखरपुड्याच्या कार्यक्रमात शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली. मात्र श्रद्धा या कार्यक्रमात कुठेच दिसली नाही.बहुधा ती शूटींगमध्ये व्यस्त असावी. पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांकने अलिकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटात तो झळकला होता. 

एका आघाडीच्या वेबसाईटच्या वृत्तानुसार, प्रियांक आणि शाजा हे नवीन वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ते आधी कोर्ट मॅरेज करतील आणि त्यानंतर ते मोठ्या शाही थाटात रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive