By  
on  

आगामी 'बेफाम' ह्या मराठी सिनेमाचा उलगडला फर्स्ट लुक

यशाचे आणि अपयशाचे उत्तम समीकरण साधणारा नवाकोरा 'बेफाम' हा चित्रपट लवकरच 'अमोल कागणे प्रोडक्शन'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे उत्कंठा वाढविणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अमोल कागणे स्टुडिओझ प्रस्तुत, निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे यांनी दिग्दर्शित केला आहे. 'हलाल', 'लेथ जोशी', 'परफ्युम', 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटांच्या निर्मिती नंतर अमोलचा 'बेफाम' हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत हा चित्रपट असून लेखक विद्यासागर अद्यापक लिखित या चित्रपटाची कथा आहे.

 

गायक अमित राज, मंदार खरे यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत, तर गायक क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत लहरींवर या चित्रपटातील गाण्यांनी चारचाँद लावले आहेत. संकलन राजेश राव आणि कलानिर्माता मिथिलेश सिंग राजपुत तर प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून अजय सोनी आणि वितरक म्हणून 'पिकल एंटरटेनमेंट' अशी इतर श्रेयनामावली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार हे अजूनही गुलदस्यात ठेवण्यात आले आहे. आणि चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive