By  
on  

या मालिकेत अभिनेत्री सुखदा खांडकेकर साकारतेय महत्त्वाची भूमिका

पुण्यश्लोक अहिल्या बाई ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा प्रेक्षकांना मालिका स्वरुपात पाहायला मिळतोय. सध्या मालिकेची बरीच चर्चा असताना या हिंदी मालिकेत विविध भूमिका साकारणाऱ्या मराठी कलाकारांची देखील चर्चा आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा टेलिव्हिजनवर पाहायला मिळतेय.

अभिनेत्री सुखदा खांडकेकरची देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका आहे. सुखदा या मालिकेत द्वारकाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. सुखदाने सोशल मिडीयावर पोस्ट करून या भूमिकेसाठी मिळणाऱ्या प्रतिक्रियेविषयी सांगितलं. शिवाय या मालिकेच्या सेटवरील फोटोदेखील शेयर केला आहे. 

 

या मालिकेत सुखदासह राजेश श्रृंगारपुरे, स्नेहलता वसईकर, भाग्यश्री न्हालवे यासह अनेक मराठी कलाकार आहेत. बालकलाकार अदिती जलतारे लहानपणीच्या अहिल्याबाईंच्या भूमिकेत दिसतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive