आजच्या तरुणाईची गोष्ट सांगणारी वेबसिरीज– “मी, माझी गर्लफ्रेंड आणि...”

By  
on  

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायला नको. हे नातंच खूप भन्नाट असतं. या नात्यात येण्याआधी आणि यातून जाण्याआधी, या नात्यात असतांना अनेक गोष्टी कळतात. फक्त आणि फक्त याच सिच्यूएशनमध्ये दोघांना एकमेकांबद्दलच्या गोष्टी जास्त प्रमाणात कळतात, त्याचे काय पडसाद उमटतात, यावर भाष्य करणारी एक नवीन फ्रेश वेबसिरीज मालिका "मी, माझी गर्लफ्रेंड आणि ..." कॅफेमराठीच्या युट्युब चॅनलवर रिलीज झाली आहे.

मोठमोठया Sप्सवर मोठ्या अवधीच्या सिरीज पाहण्यापेक्षा छोट्या सिरीज आणि शॉर्ट व्हिडीओ पाहणे अलीकडे जास्त पसंत केले जात असल्यानेच कॅफेमराठीचे संस्थापक निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांनी या सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.

सध्याचे तरुण कपल्स हे आपल्याला सोशल मीडियावर जास्त सक्रिय असताना दिसतात. प्रत्येक लहान सहान गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एक गोड कपलची लाईफ आणि त्यांच्या आयुष्यात घडणा-या गोड, आंबट. तिखट अशा मजेदार किस्स्यांची धमाल यात असणार आहे. या वेबसिरीजची मालिका पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि तरुण वर्गाला आपलीशी वाटेल. कॅफेमराठीने या आधी हि अनेक वेगवेगळ्या पठडीतील आणि तरुणांवर आधारित वेबसिरीज आपल्यासाठी आणल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कंटेन्ट मध्ये आपल्याला वेगवेगळी आकर्षक अशी नवीन कल्पना पाहायला मिळते. अशाच नवीन कल्पनेला साजेशी अशी हि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि त्यांच्या रोजच्या जीवनात घडणा-या छोट्यामोठ्या पण लक्षात राहणा-या किस्स्यांवर , गोष्टींवर आधारलेली हि सिरीज आहे.

या वेबसिरीज मध्ये तुम्हाला कॅफेमराठी प्रस्तुत 'फुल ऑन राडा' फेम आणि मराठी चित्रपट 'विकून टाक' मधील अभिनेता रोहित माने आणि सोनी मराठी वरील 'सारे तुझ्याचसाठी' तसेच  स्टार प्रवाहवरील 'तू आहेस ना' मालिकेतील फेम असणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. एका वेगळ्या पठडीतील आणि वेगळ्या अशा आशयातील असणारी कॅफेमराठीची हि वेबसिरीज तरुण वर्गाला नक्कीच आवडेल.

Recommended

Loading...
Share