By  
on  

पाहा Video : संजना फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या निमित्ताने बनवले लाडू

'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रत्येक पात्र हे महत्त्वाचं आणि लक्षवेधी ठरलय. या मालिकेतील संजना या पात्रानेही आत्तापर्यंत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. नकारात्मक पात्र असूनही या पात्रातील चढ-उतार अभिनेत्री रुपाली भोसले उत्तम साकारताना दिसते. याचसाठी रुपालीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केलीय. दिवाळीच्या निमित्ताने सध्या रुपाली कुटुंबासोबत वेळ घालवतेय. शिवाय यावेळी तिने खास बेतही केलाय.

 

रुपालीला विविध पदार्थ बनवण्याची प्रचंड आवड आहे. म्हणूनच दिवाळीच्या निमित्ताने तिने घरात लाडूचा बेत केला. लाडू वळतानाचा तिचा व्हिडीओ नुकताच समोर आलाय. तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने रुपाली विविध पदार्थ बनवताना दिसते. रुपालीच्या घरात सध्या फराळाचे विविध पदार्थ बनवले जात आहेत. यात लाडू, चिवडा, शंकरपाळी असे विविध पदार्थ रुपालीने बनवलेत. या निमित्ताने ती कुटुंबासोबत छान वेळ घालवतेय. 

सोशल मिडीयावर रुपालीचा मोठा चाहतावर्ग आहे. विविध हिंदी, मराठी मालिका, चित्रपट, नाटक यात रुपाली आत्तापर्यंत झळकलीय. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात रुपाली स्पर्धक म्हणून दिसली होती. 'आई कुठे काय करते' मालिकेतील तिचं काम लक्षवेधी ठरतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive