By  
on  

'अजिंक्य' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, झळकणार भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे

'अजिंक्य' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ल्युमिनरी सिने वर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. ग्रामीण आणि नगरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थिती वर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक अजिंक्यच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री, अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा हे चित्रपटाचे निर्माते असून उमेश नार्वेकर सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

 

 या सिनेमाचं दिग्दर्शन ए कादिर यांनी केलय. तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील त्यांनी लिहीलेत. रोहन-रोहन यांनी या चित्रपटाला संगीत दिलय. या चित्रपटातील "अलगद अलगद", "स्वप्नांना", "आता तरी बोल ना" आणि "फेव्हरेट राव" ही गाणी देखील प्रदर्शनाआधी लक्ष वेधून घेत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive