नुकताच फिल्मफेयरचा ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी अनेक कलाकार खास पेहरावात दिसले. यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या खास लुक्सनी.
यावेळी सई ताम्हणकरने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सईचा हा लुक या सोहळ्यात लक्षवेधी ठरला. तर दुसरीकडे अमृता खानविलकरनेही पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.
यावेळी सई आणि अमृता या पांढऱ्या रंगाच्या पेहरावात ट्विनिंग करताना दिसले. अमृताने यावेळचा ट्विनिंग फोटोही सोशल मिडीयावर शेयर केलाय.
शिवाय सई आणि अमृताच्या या लुकमधील फोटोंना सोशल मिडीयावर पसंती मिळाली आहे.