पाहा Video : जय दुधाणेच्या समर्थनार्थ पुढे आला रणविजय सिंह, बिग बॉस मराठीसाठी जयला दिल्या शुभेच्छा

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. नुकतच शेवटचं एलिमिनेशन झालं असून स्पर्धक मिरा जगन्नाथ ही घराबाहेर पडली आणि आता टॉप 5 फायनलिस्ट फिनाले पर्यंत पोहोचले आहेत. यात जय दुधाणे, मिनल शाह, विकास पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे हे स्पर्धक टॉप 5 फानलिस्टच्या यादीत दाखल झाले आहेत. 

 

येत्या 26 डिसेंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन 3 चा फिनाले पार पडणार आहे. यासाठी स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्पर्धकांना समर्थन देण्यासाठी चाहते आणि सेलिब्रिटी मंडळी पुढे आली आहेत. यात जय दुधाणेचं समर्थन करण्यासाठी चक्क रणविजय सिंहने चाहत्यांना वोटिंगचं आवाहन केलय.

जय दुधाणेच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन रणविजयचा व्हिडीओ नुकताच शेयर करण्यात आलाय. जय हा स्प्लिट्सविलाच्या 13 व्या सिझनचा विजेता ठरला होता. ज्यात रणविजय परिक्षक म्हणून होता. म्हणूनच जय आणि रणविजयची ओळख असल्याने रणविजयने जयचं समर्थन केलय. अभिनेत्री दिव्या अग्रावलही जयला सपोर्ट करताना दिसतेय. 

तेव्हा या टॉप 5 स्पर्धकांपैकी कुणाच्या हाती बिग बॉस मराठी सिझन 3 ची ट्रॉफी येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share