By  
on  

पाहा Video : वर्षाअखेर हा अभिनेता चढला बोहल्यावर,बांधली लगीनगाठ

2021 या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. बॉलीवुडसह मराठी मनोरंजन विश्वातही अनेक लग्न पाहायला मिळाले. यातच वर्षाच्या शेवटाला आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढलाय. अभिनेता सुयोग गोऱ्हेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. 

नेहा शिंदेसोबत सुयोगचा विवाहसोहळा संपन्न झालाय. या लग्नसोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ नुकतेच समोर आले आहेत.

 

अभिनेत्री रसिका सुनीलने या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. रसिका ही सुयोगची मैत्रीण असल्याने ती या विवाहसोहळ्यात हजर होती. तर दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील पत्नी मिताली मयेकरसोबत या विवाहसोहळ्यात उपस्थित होता. 

या कलाकारांनी सुयोगच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive