By  
on  

पाहा Video : 'बीवी नंबर 1' मानसी नाईकने प्रदीपसोबत केला असा व्हिडीओ, मानसीने केला साज-श्रृंगार

अभिनेत्री मानसी नाईक अनेक कार्यक्रमांच्या मंचावर तिच्या नृत्यकौशल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तसच सोशल मिडीयावरही मानसी नाईकचे व्हिडीओ लक्षवेधी ठरतात. गेल्या काही वर्षांपासून मानसी ही सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरतेय. लग्नानंतर तर मानसीचे तिच्या पतीसोबतचे व्हिडीओ आणि फोटोही चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. कारण या व्हिडीओत मानसी बनलीय बीवी नंबर 1. 

 

नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मानसी आणि प्रदीप खास पेहरावात दिसले. यावेळी मानसीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर असा नव्या नवरीचा साज मानसीने केला होता. याच खास लुकमध्ये मानसी आणि प्रदीपने खास व्हिडीओ केलाय.

'बीवी नंबर वन' या प्रसिद्ध गाण्यावर दोघांनी हा व्हिडीओ केलाय. बीवी नंबर 1 असलेली मानसी आणि प्रदीपची जोडी यात लक्ष वेधून घेतेय. या हटके जोडीचे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. शिवाय अनेक व्हिडीओमध्ये मानसी आणि प्रदीपची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते.

Recommended

PeepingMoon Exclusive