By  
on  

अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण, म्हटला "पुन्हा त्याच जोशात आणि जोमात तुमच्यासमोर येईन"

नव्या वर्षाची सुरुवात होत असताना 2022 मध्येही कोरोना विषाणूने थैमान घातल्याचं पाहायला मिळतय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतय. यातच अभिनेता अंकुश चौधरीलाहा कोरोनाची लागण झाली आहे. 

अंकुशने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. अंकुशने ट्विटरवर त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिलीय. 

 

अंकुशने ट्विटमध्ये म्हटलय की, "नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन.माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी."

तर दुसरीकडे हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive