अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई यांच्या निधनाने विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. राजकीय क्षेत्र, मनोरंजन विश्वासह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सिंधुताईंना आजवर भेटलेल्या व्यक्तिंना सिंधुताईंना कायम मार्गदर्शन केलय. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. सिंधुताईंच्या निधनाने प्राजक्तालाही दु:ख झालय. एका कार्यक्रमादरम्यान प्राजक्ता आणि सिंधुताईंची भेट झाली होती. तो क्षण प्राजक्ताने सोशल मिडीयावर शेयर करत भेट अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त केलीय.
प्राजक्ता लिहीते की, "माई नेहमी म्हणायच्या हे जगावेगळं लेकरू आहे, धडपडी आहे, गोड आहे.. पण आज याच लेकराला पोरकं करून निघून गेल्या. लॉकडाऊन मध्ये त्यांची शेवटची भेट झाली. मी चहा नाही घेत म्हटल्यावर चार दाणे साखरेचे तरी घेऊन जा पोरी असं आपुलकीने बोलल्या. आणि त्यांनी हातावर साखर ठेवली. दहा महिने झाले एकाच जागी आहे. लेकरं कुठेच जाऊन देत नाहीत .पाय दुखायला लागले आता. पण त्यांची लेकरांसाठी ची धडपड गप्प बसू देत नव्हती. संघर्षाला कसं सामोरं जायचं ? परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ? यासाठी कायम मार्गदर्शन करणाऱ्या, तू जगावेगळी आहेस आणि तुला जगावेगळं करायचं आहे हे लक्षात ठेव असं सतत सांगणाऱ्या माई तुम्ही म्हणाला होतात मला...हे सगळं लॉकडाऊन संपल्यावर आपल्याला भेटायचंय. वाईट वाटतंय... ही भेट अपूर्णच राहिली......."
प्राजक्ताला भेटून सिंधुताईंना आनंद व्यक्त केला होता शिवाय तिचं कौतुकही केलं असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतय.