By  
on  

ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी आगामी वेबसिरीज 'बदली' लवकरच येणार भेटीला

'बदली' ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज 15 जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. शहरातील शिक्षक जेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे या सिरीजमध्ये पाहायला मिळेल. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षणासंदर्भातील विचार या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या शिक्षकाने पेललेल्या आव्हानाला यश मिळणार का त्यांची भ्रमनिराशा होणार सिरीजमध्ये पाहायला मिळेल.

'बदली' या वेबसिरीजचे लेखन,दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के यांनी निर्मिती केली आहे. या वेबसिरीजची कथा पटकथा आणि संवाद नितीन पवार यांची असून छायांकन वीरधवल पाटील यांनी केले आहे. तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive