2022 या नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलय. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळतय. यातच आणखी एका अभिनेत्रीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याच तिने सोशल मिडीयावर सांगितलय.
मिथिलाने लिहीलय की, "हाय मित्रांनो, कोव्हिड पॉझिटीव्हसोबत मी माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केलीय. मला कोणतीही लक्षणे नाहीत आणि स्वत:ला वेगळं ठेवलय. मित्रमैत्रीणी आणि परिवाराकडून वर्चुअली मिळणारं प्रेम याची मजा लुटतेय. माझा परिवार लांब आहे. त्यांच्याविषयी जास्त काळजी घेतलीय. खासकरुन माझ्या आजी - आजोबांची. मी काम सुरु केल्यापासून त्यांना फार कमी भेटतेय. गेल्या दहा दिवसांत मी ज्यांना भेटलीय त्यांना सांगण्यात आलय. मी हे सांगायला आलीय की तुम्ही मास्क घाला आणि काळजी घ्या."
येत्या 11 जानेवारी रोजी मिथीलाचा वाढदिवस असून त्याआधीच तिला कोरोनाची लागण झाल्याचं ती या पोस्टमध्ये म्हटलीय.