अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. दोघांनी एकमेकांना अंगठी घालून या नात्याची नवी सुरुवात केली आहे. विराजस आणि शिवानी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून विराजस आणि शिवानीने दोघही एन्गेज झाल्याची बातमी दिली आहे.
विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. तेव्हा मृणाल यांनीही सोशल मिडीयावर या जोडीचा फोटो शेयर केला आहे. मात्र त्यांनी लिहीलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरलय. त्यांनी लिहीलय की, "मैत्री नात्यात रुपांतरित होणार... या वर्षी ?"
तेव्हा या वर्षी दोघांचं लग्न होणार आहे की काय अशा चर्चा रंगल्या आहेत. मृणाल यांनी या नात्याच्या नव्या सुरुवातीविषयी पोस्ट करताना या वर्षी असं लिहीत पुढे प्रश्नचिन्ह लिहीलय. त्यामुळे नेमकं लग्न कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
मात्र या नात्यात लवकरच मृणाल कुलकर्णी या शिवानीच्या सासू होणार आहेत. तेव्हा विराजस आणि शिवानीच्या लग्नाच्या चर्चांना आता उधाण आलय.