By  
on  

पाहा Video : उत्कर्ष शिंदेने घेतली त्या चहावाला चाहत्याची भेट

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नुकतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या कार्यक्रमातील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धक उत्कर्ष शिंदेचेही असंख्य चाहते आहेत. यापैकीच एक आहे एक चहावाला. उत्कर्षच्या खेळाने एका चहा विकणाऱ्याचं मनं जिंकलय. 

उत्कर्ष शिंदेने नुकतीच याच चहावाल्याची भेट घेतली आहे. आणि त्याच्या टपरीवरच्या चहाचा आस्वादही घेतलाय. यावेळी उत्कर्षला पाहुन चहावाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

 

उत्कर्षने या चहावाल्यासोबतचा व्हिडीओ शेयर करत खास पोस्ट केली आहे.  उत्कर्ष लिहीतो की, ""टपरी वरचा चहा जितका भारी होता,तितकाच तो चहा बनवणारे काका भारी होते" बिग बॉस चे आणि माझ्या परफॉर्मन्स चे चाहते जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा वेगळाच आनंद होतो.गावा गावात ते शहर शहरात जिथे दिसतो तिथे रसिक माय बाप भरभरून प्रेम देत आहेत हे पाहून शंभर दिवस बिग बॉस मधे एक कलाकार म्हणून माझ्या टास्क मधून ,ऍक्टिंग ,गाण्यात ,होस्टिंग ,ऍंकरिंग मधून ऑलराऊंडर, मास्टरमाईंड, टास्क मास्टर नाव तर कमावलच पण त्याहून हि जास्त महाराष्ट्राच मन जिंकल ह्याच अभिमान जास्त आहे .महाराष्ट्राच प्रेम जितका मला लाभत आहे त्याचा मी सदैव ऋणी राहीन."

बिग बॉस मराठी सिझन 3 नंतर सोशल मिडीयावर इतर स्पर्धकांप्रमाणे उत्कर्षचाही मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive