By  
on  

पाहा Video : ही अभिनेत्री देखील थिरकली साराच्या 'चका चक...' गाण्यावर

सोशल मिडीयावर सध्या कोणतं नवीन गाणं आलं की मग त्या गाण्यावरील डान्स व्हिडीओचा ट्रेंड पाहायला मिळतो. सध्या विविध गाणी ट्रेंडिंग असताना अतरंगी रे सिनेमातील चका चक या गाण्याची सोशल मिडीयावर चलती आहे. सेलिब्रिटींसह अनेकजण या गाण्यावर डान्स व्हिडीओ करताना दिसत आहेत.

अगदी अमृता खानविलकरपासून बऱ्याच मराठी अभिनेत्री देखील या गाण्यावर थिरकल्या आहेत. साराने साडी नेसून या गाण्यावर केलेली हटके स्टेप लक्षवेधी ठरतेय. ही स्टेप आणि हे गाणं आता चांगलच व्हायरल झालं आहे. 

अशात सोशल मिडीयावर कोणताही ट्रेंड कायम फॉलो करणारी मानसी नाईकही यात मागे नाही. मानसीने देखील चका चक है तू या गाण्यावर धमाल डान्स केला आहे.

 

विशेष म्हणजे साडी नेसून, सुंदर साज करून मानसी या गाण्यावर थिरकताना दिसतेय. या डान्स व्हिडीओ तिने पती प्रदीपला डेडीकेट केलाय. मानसी या पोस्टमध्ये लिहीते की, "तेरे सीने से लगकर तेरी आरजू बन जाऊं,तेरी साँसों से मिलकर तेरी ख़ुशबू बन जाऊं, फ़ासले ना रहे हम दोनों के दरमियाँ कोई, मैं, मैं ना रहूँ बस तुम बन जाऊं"

सोशल मिडीयावर मानसीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय.मागील वर्षी 2021 मध्ये मानसी आणि प्रदीपने लगीनगाठ बांधली. दोघंही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive