By  
on  

पाहा Photos : बाळासोबतच्या रिंक राजगुरुच्या गोंडस फोटोंनी वेधलं लक्षं

'सैराट' फेम रिंकू राजगुरु ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रिंकू ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांना रिंकूचे नवे फोटो आणि विविध व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. 

नुकतेच रिंकूने सोशल मिडीयावर शेयर केलेले फोटो लक्षवेधी ठरले आहेत. रिंकूने तान्ह्या बाळासोबतचे गोंडस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत. 

रिंकूच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. रिंकू अधूनमधून तिच्या अकाउंटवर तिच्याविषयीच्या लेटेस्ट अपडेट टाकताना दिसते. कधी रिंकूचे साडीतले सुंदर फोटो तर कधी मांजरींसोबतचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामुळे रिंकू तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडली गेली आहे. 

'सैराट'नंतर विविध मराठी, हिंदी चित्रपट, सिरीज केल्यानंतर आगामी काळातही रिंकू विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive