नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतय. पुन्हा 2022 या वर्षातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून कोव्हीड चाचणी पॉझिटीव्ह आलीय. यात मनोरंजन विश्वातही कोरोना व्हायरस शिरल्याचं पाहायला मिळतय. यात अभिनेता जितेंद्र जोशीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
जितेंद्रने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. कोरानाची लागण झाल्यानंतर अत्यंत त्रासदायक आणि तापदायक अनुभव असल्याचं जितेंद्र या पोस्टमध्ये म्हणतोय.
जितेंद्रने पोस्टमध्ये लिहीलय की, "कोरोना ने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि "ताप"दायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्व लक्षणे!! माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझे RTPCR रिपोर्ट्स लवकरच मिळतील.वैद्यकीय उपचार सुरू आहेत."
सोशल मिडीयावर दररोज विविध कलाकारांच्या कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आल्याच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. यात बॉलीवुडसह अनेक मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.