By  
on  

ओटीटी नंतर अखेर सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'वेल डन बेबी'

2020 साली अनेक चित्रपट कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शित होऊ शकले नाही. असे काही चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाले तर काही यावर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपटांनी ओटीटीचा मार्ग पत्करला. यात 'वेल डन बेबी' हा चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना सिनेमागृहात घेता आला नाही.

मात्र हा चित्रपट आता सिनेमागृहात भेटीला येत आहे. वेल डन बेबी हा चित्रपटा आता प्रेक्षकांना मोठा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या 14 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. लॉकडाऊन मध्ये अमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसिद्ध झालेल्या वेल डन बेबी चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचा अभूतपर्व प्रतिसाद लाभला.

अभिनेता पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. बाळाची चाहुल लागताच जोडीदारांमधील बदलणारं नातं या विषयावर हा सिनेमा आहे.  एकीकडे मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना सिनेमागृहात मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहता या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.                 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive