सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईल जोगळेकर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या मैत्रीचं नातं प्रेमात झालं. आणि हे प्रेमाचं नातं आता लवकरचं लग्नाच्या नात्यात रुपांतरित होणार आहे. लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. यावर्षी दोघं लगीनगाठ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता दोघांनीच त्याविषयी सोशल मिडीयावर जाहीर केलय.
गेले काही दिवस रोहित आणि जुईली हे काउंटडाउन पोस्ट करत दोघांचे एकत्र फोटो शेयर करत आहेत. ज्यात एक एक दिवस मोजला जातोय. नुकत्यात केलेल्या पोस्टमध्ये 9 दिवस बाकी असं लिहीण्यात आलय. आता हे दिवस नेमके कशासाठी मोजले जात आहेत याचा अंदाज सोशल मिडीयावर बांधण्यात आलाय. लवकरच दोघं लग्न करत असल्याचं बोललं जातय. याशिवाय दोघांनी #rohilee ही तयार केलय. तेव्हा दोघं काहीच दिवसांत लग्न करत आहेत की काय असा प्रश्न पडलाय.
आता हे काउंटडाऊन नेमकं रोहित आणि जुईलीच्या लग्नाचं आहे की कशासाठी यासाठी वाट पाहावी लागणार आहे.