By  
on  

पाहा Video : " कधी करु झोंबिवली रिलीज?", म्हणत अमेय आणि ललितने केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. त्यातच एक असाच व्हिडीओ नुकताच चर्चेत आलाय. या व्हिडीओत मराठीतील आखाडीच्या दोन कलाकारांनी बॉलीवुडमधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स केलाय. हे कलाकार आहेत अभिनेता अमेय वाघ आणि ललित प्रभाकर. झोंबिवली या आगामी चित्रपटात दोघंही मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांनी वॅनिटीच्या दाराजवळ डान्स केलाय.

'अंदाज अपना अपना' या प्रसिद्ध बॉलीवुड सिनेमाच्या गाण्यावर दोघं थिरकले आहेत. दोघांचं विनोदी अंदाज या व्हिडीओत पाहायला मिळतोय. "दो मस्ताने चले जिंदगी बनाने..." या गाण्यावर अमेय आणि ललितने धमाल केलीय. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चर्चेत आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

याशिवाय या व्हिडीओच्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय. अमेयने लिहीलय की, "दो मस्ताने चले झोंबी की जिंदगी बनाने ! कधी करु झोंबिवली रिलीज? तुम्ही date सांगा फक्त! बोला !!"

तर झोंबिवली हा चित्रपट कधी प्रदर्शित करायचा हाच प्रश्न त्यांनी प्रेक्षकांना विचारलाय. सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता झोंबिवली या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचही पाहायला मिळतय. तेव्हा हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे लवकरच कळेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive