पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसानिमीत्ताने मानसी आणि प्रदीपने एकमेकांना दिलं हे खास गिफ्ट

By  
on  

अभिनेत्री मानसी नाईकने 2020 मध्ये ती प्रेमात असल्याचं सांगत तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मानसीने तिच्या वाढदीवसाला ती प्रदीपसोबत रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. 2021 मध्ये मानसी आणि प्रदीपने लग्न करून संसार थाटला. याच दिवसाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. याच लग्नाच्या वाढदिवसाचा महिना दोघं सेलिब्रेट करत आहेत. लग्नाच्या वाढदिवसाआधीच दोघांनी एकमेकांना एक खास गिफ्ट दिलय.

मानसी आणि प्रदीपने हातावर राजा आणि राणी यांचे चिन्ह दर्शवणारे टॅटू हाताच्या बोटांवर काढून घेतले आहेत. दोघांच्या सोबतीचा हा प्रवास कायम ठेवण्याचं आश्वासन एकमेकांना दिलय. नुकतच सोशल मिडीयावर हे टॅटू काढतानाचे व्हिडीओ मानसी आणि प्रदीपने शेयर केले आहेत. 

 

लग्नाच्या वाढदिवसाआधीच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने एकमेकांना दिलेलं हे गिफ्ट नेटकऱ्यांनाही चांंगलच आवडलेलं दिसतय. मात्र आता लग्नाच्या वाढदिवसाला दोघं एकमेकांना काय गिफ्ट देतील हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

मानसी आणि प्रदीप काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहेत. 19 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लगीनगाठ बांधली होती. मानसी ही एक अभिनेत्री असून उत्तम नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. 

Recommended

Loading...
Share