23 जानेवारी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी लग्नाआधीच्या विविध विधी सध्या सुरु आहेत. यातच नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडलाय. नुकतेच रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यातील काही खास एक्सक्लुझिव्ह क्षण पिपींगमून मराठीच्या हाती आले आहेत.
या फोटोंमध्ये रोहित - जुईलीचा साखरपुड्याचा खास लुक पाहायला मिळतोय. यात जुईलीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तर रोहितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर निळ्या रंगाचं जॅकेट असा हा पेहराव आहे.
सोशल मिडीयावर रोहित आणि जुईलीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय #Rohilee हे हॅशटॅगदेखील चर्चेत आलय. येत्या 23 जानेवारी रोजी मुळशी येथे दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतिने हे लग्न पार पडणार असून त्याच दिवशी रिसेप्शन सोहळा देखील पार पडेल.