पाहा Video : रितेश - जेनेलियाने केलं दत्तक जाणाऱ्या कुत्रीचं नामकरण, जेनेलियाने कुत्रीला दिलं स्वत:चं नाव

By  
on  

मनोरंजन विश्वातील कलाकार हे कायम सामाजिक भान जपून विविध संस्थांशी जोडले जातात. काही प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थाही असतात. अनेक सेलिब्रिटी हे प्राणीप्रेमी आहेत. त्यात विविध मांजरी, कुत्री दत्तक घेणाऱ्या विविध संस्थांशी काही सेलिब्रिटी जोडले जातात. अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख हे देखील प्राणीप्रेमी आहेत. विशेष म्हणजे कुत्री दत्तक घेणाच्या विविध योजनांशी ते जोडले जातात. योडा (YODA) या संस्थेमार्फत रस्त्यांवरील कुत्र्यांना दत्तक देण्याच्या कार्यातही रितेश आणि जेनेलिया अनोख्या पद्धतिने जोडले गेले आहेत. 

 

तीन महिन्यांच्या एका कुत्रीला दत्तक देण्याच्या कार्यात रितेश आणि जेनेलियाने सहभाग घेतला. एवढच नाही तर त्या गोंडस कुत्रीचं नामकरणही केलय. विशेष म्हणजे जेनेलियाने या कुत्रीचं नाव जेनेलिया असचं ठेवलय. या संस्थेने सोशल मिडीयावर रिलीज केलेल्या व्हिडीओत रितेश आणि जेनेलिया या जुनियर जेनेलियासोबत खेळताना दिसत आहेत. शिवाय रितेशही या पेट डॉगला जेनेलिया नावाने हाक मारताना दिसतोय. 

रितेश - जेनेलियाने या गोंडस कुत्रीचं केलेलं नामकरण सध्या लक्षवेधी ठरतय. शिवाय सध्या ही गोंडस कुत्री दत्तक देण्यासाठी ठेवण्यात आली असून तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय. 

Recommended

Loading...
Share