गीतकार क्षितिज पटवर्धनचं हे स्वप्न पूर्ण, चक्क बिग बींनी म्हटली क्षितिजने लिहीलेली कविता

By  
on  

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं. असच स्वप्न पूर्ण झालय एका प्रसिद्ध गीतकाराचं. तो म्हणजे मराठी, हिंदीत गीतकार म्हणून काम करणारा लेखर क्षितिज पटवर्धन याचं. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी तयार केलेल्या एका व्हिडीओसाठी क्षितिजने सुंदर कविता लिहीली. मात्र ही कविता दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याने नाही तर चक्क महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओत म्हटली आहे.

 

क्षितिजने ही आनंदाची बातमी त्यांच्या सोशल मिडीयावर शेयर करत आनंद व्यक्त केलाय. शिवाय त्यांचं हे स्वप्न पूर्ण झाल्याचही सांगितलय. क्षितिज पोस्टमध्ये लिहीतो की, "कुठल्याही कवीचं स्वप्न असतं की आपली कविता अजरामर आवाजात म्हणली जावी, आज महानायक अमिताभ बच्चन यांनी माझी एक कविता म्हणली आहे, सादर करतो आहे.. मन में है मैदान! सोबत 18 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्या खेळाडूंनी म्हणलेले राष्ट्रगीत आहे, कारण या सगळ्यामुळे राष्ट्रगीत जगाच्या कानाकोपऱ्यात वाजलं आहे. रसिका कुलकर्णी निलेश कुलकर्णी आणि अभिजीत पानसे तुमचा कायम ऋणी राहीन!"

 

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओत 18 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेते खेळाडू पाहायला मिळत आहेत. शिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कवितेने या व्हिडीओची सुरुवात होतेय.

Recommended

Loading...
Share