‘लोच्या झाला रे’ चा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित

By  
on  

'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दणक्यात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला  अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट येत्या 4 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांसोबतच कलाकारही चित्रपट प्रदर्शनासाठी अतिशय उत्सुक आहेत.

 

सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित  'लोच्या झाला रे'मध्ये सयाजी शिंदे यांचा भाचा, अंकुश चौधरीच्या बायकोला भेटायला लंडनला येतात आणि तिथूनच सगळा लोच्या व्हायला सुरुवात होते. चित्रपटात वैदेही परशुरामी नेमकी अंकुशची बायको आहे का सिद्धार्थची? याबाबत झालेला गोंधळ आपल्याला यात पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोंधळात  इतर कलाकारांचाही सहभाग असल्याचे आपल्याला ट्रेलरमध्ये  पाहायला मिळत आहे.  

 

 पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी   'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन  केले असून छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी  सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.

Recommended

Loading...
Share