पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसाला सिद्धार्थ - मितालीने शेयर केले हे अतरंगी क्षण

By  
on  

2021 या मागील वर्षात अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले होते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनीदेखील मागील वर्षी 24 जानेवारी रोजी लगीनगाठ बांधली होती. नुकतच दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून दोघांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नाचे खास अतरंगी क्षण शेयर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

दोघांनी शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. 24 जानेवारी 2021 रोजी सिद्धार्थ आणि मितालीने पारंपारिक मराठमोळ्या पद्धतिने लग्न केलं होतं. लग्नाआधी संगीत, मेहंदी आणि हळदी समारंभही चांगलेच चर्चेत आले होते. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धार्थ आणि मितालीला सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Recommended

Loading...
Share