By  
on  

पाहा Video : खास मित्राच्या नव्या कारमध्ये सफर करून मुक्ता बर्वेने अशी मारली शायनींग

मैत्री ही आयुष्यात अनेक आनंदी क्षण घेऊन येते. असाच एक आनंदी क्षण अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या आयुष्यात आला. मुक्ताच्या खास मित्राने गाडी घेतली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुक्ताने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत मुक्ता प्रचंड आनंदी दिसतेय. या आनंदाचं कारणही तसच आहे.

मुक्ताचा खास मित्र अभिनेता संदीप पाठकने नुकतीच नवी गाडी घेतलीय. संदीपसाठी ही त्याची ड्रीम कार होती. याच गाडीत उभं राहून मुक्ता आणि संदीपने फिरण्याचा आनंद लुटलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

संदीपसाठी मुक्ताने खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये मुक्ता लिहीते की, "तुमचा सख्खा दोस्त जेव्हा त्याची ड्रीम कार घेतो तेव्हा जास्त शायनींग तुम्हीच मारता. तुझा अभिमान आहे पाठक्या. कॉलेजच्या दिवसांमध्ये गेल्यासारखं वाटतय. जवळच्या मित्रांबरोबर घालवलेला वेळ वाया जात नाही , आयुष्य वाढवतो."

सोशल मिडीयावर मुक्ता बर्वेचा मोठा चाहता वर्ग आहे. या चाहत्यांनाही या मित्रांची ही धमाल मस्ती चांगलीच आवडलीय. 'अजुनही बरसात आहे' या मालिकेतून मुक्ता प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मुक्ताची मीराच भूमिका आणि उमेशसोबतची मीरा - आदिराज ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive