By  
on  

दाक्षिणात्य चित्रपटात एक्शन करताना दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या विविध अपडेट सोशल मिडीयावर शेयर करते. प्राजक्ताने नुकतीच एक खास बातमी सोशल मिडीयावर चाहत्यांना सांगितली आहे.

प्राजक्ता साऊथ चित्रपटात झळकणार असल्याचं तिने सांगितलय. एवढच नाही तर या चित्रपटासाठी तिने एक्शनही केलीय. सध्या प्राजक्ता या चित्रपटासाठी चित्रीकरण करत असतानाचे फोटो तिने शेयर केले आहेत. विशेषकरून तिच्या एक्शन सीनसाठीचा मेकअप आणि लुकही शेयर केलाय. 

 

प्राजक्ता या पोस्टमध्ये लिहीत की, "आता साऊथ चित्रपट म्हटल्यावर एक्शन सीन्स तर असणारच... मेकअप दादांची कमाल.. टीझर शूट."

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ताने येसूबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे प्राजक्ता प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यानंतर आई माझी काळुबाई या मालिकेतही प्राजक्ता झळकली. मात्र या मालिकेसोबतच्या वादानंतर प्राजक्ता पुन्हा कोणत्याच मालिकेत झळकली नाही. सध्या प्राजक्ता विविध चित्रपटांसाठी काम करतेय. आगामी काळात ती मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive