By  
on  

रिंकू राजगुरु या अभिनेत्याला करतेय डेट ? रिंकूची या अभिनेत्यासोबत डिनर डेट

'सैराट' या चित्रपटाने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाप्रमाणेच चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु आणि परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसरही प्रचंड लोकप्रिय झाले.

आर्चीच्या भूमिकेमुळे रिंकू इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी सिरीज, चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे रिंकूविषयीची कोणतीही बातमी आली की त्याविषयी चर्चा होते. मात्र सध्या रिंकूच्या बाबतीतली एक गोष्ट चर्चेत आहे. रिंकू ही एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

सोशल मिडीयावर रिंकूने या अभिनेत्यासोबत डेटला गेल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे रिंकूचा सैराटमधील सहकलाकार आकाश ठोसर. रिंकू आणि आकाशची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. सैराट चित्रपटानंतरही त्यांनी मैत्री कायम ठेवली आहे. नुकतच रिंकू आणि आकाश दोघं खास डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी दोघांनी एकत्र वेळ घालवला. या डिनर डेटचे फोटो दोघांनी सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. एवढच नाही तर या डिनर डेटनंतर रिंकू घरी जाताना आकाशने तिचा व्हिडीओ शूट केलाय आणि लवकरच भेटू असं लिहीलय.

रिंकू आणि आकाशची ही डिनर डेट सध्या चर्चेचा विषयी ठरलीय. दोघांमध्ये मैत्री आहे की दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive