By  
on  

‘बाई वाड्यावर या 2.0’ गाण्यातही झळकणार मानसी नाईक

‘बाई वाड्यावर या’ हे गाणं महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र या गाण्याच्या यशानंतर आता बाई वाड्यावर या चं दुसरं वर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यात अभिनेत्री मानसी नाईक झळकली होती. आता या गाण्याच्या 2.0 वर्जनमध्येही मानसीच्या अदा पाहायला मिळणार आहे.


मानसीने नुकताच या गाण्यातील तिचा खास लुक सोशल मिडीयावर शेयर केला आहे. जांभळ्या रंगाची नऊवारी, नथ असा खास लुक यात आहे. गायक रोहित राऊतने हे गाणं गायलं असून डॉ. विवेक सनप यांचे गीत आणि प्राज्वल यादव यांचं संगीत या गाण्याला लाभलय. 


मानसी नाईक ही आजवर विविध प्रसिद्ध मराठी गाण्यात झळकली आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ हे मानसीचं गाणं तर प्रचंड लोकप्रिय आहे. तेव्हा ‘बाई वाड्यावर या 2.0’ हे गाणं कसेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 


येत्या 4 फेब्रुवारी रोजी या गाण्याचं लिरीकल वर्जन प्रदर्शित होत आहे. तर येत्या 3 फेब्रुवारी रोजी मानसी नाईकचा वाढदिवस आहे. तेव्हा मानसीसाठी वाढदिवसाचा हा आठवडा खास असेल आणि या गाण्याने तिचा आनंद द्विगुणीत करेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive