By  
on  

लता मंगेशकर निधन Live Update : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने घेतलं लता दीदींचं अंत्यदर्शन

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील प्रभुकुंज या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.

प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मांतोडकर ही लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. अनेक सेलिब्रिटी दीदींच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह संजय लीला भंसाळी, अनुपम खेर, आशुतोष गोवारीकर, जावेद अख्तर हे देखील लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive