By  
on  

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित, सचिनसाठी आईसमान होत्या लतादीदी

गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. 

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी लतादीदी या आईसमान होत्या. सचिन आणि लतादीदींचं फार जवळचं नातं होतं. सचिनसाठी लतादीदी या आई आणि लतादीदींसाठी सचिन हा मुलासमान होता. आज शिवाजी पार्क येथे लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी सचिनही उपस्थित राहिलाय.

सचिन तेंडुलकरसोबत लतादीदींच्या अनेक आठवणी आहेत. जड अंतकरणाने सचिनही आज भारतरत्न लतादीदींनी शेवटचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क येथे सहपत्नि पोहोचलाय.

Recommended

PeepingMoon Exclusive