ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून नुकतच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अमोल पालेकर यांना दाखल करण्यात आलय.
अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
दहा वर्षांपूर्वीही अमोल पालेकर यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले म्हटल्या आहेत.