6 फेब्रुवारी हा दिवस भारतवासियांसाठी अतिशय दुखद ठरलाय. या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. मनोरंजन, संगीत विश्वासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. रविवारी प्रभुकुंज येथे लतादीदींचे अंत्यदर्शन झाल्यावर दादर, शिवाजी पार्क येथे दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
7 फेब्रुवारी रोजी ह्रदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर हे दीदींच्या अस्थी घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे पोहोचले होते. जिथे तीन कलशांमध्ये अस्थी घेण्यात आल्या होत्या.
नुकतच मंगेशकर कुटुंबिय दीदींच्या अस्थी घेऊन नाशिकला पोहोचले आहेत. नाशिक येथील रामकुंडात लता दीदींच्या अस्थी विसर्जित करण्यात येतील. याशिवाय या अस्थी काशीतील गंगेतही विसर्जित करण्यात येणार असल्याचं कळतय. तर हरिद्वारमध्येही दीदींच्या अस्थी विसर्जित केल्या जातील.