By  
on  

‘पावनखिंड’ चित्रपट पाहताना चित्रपटगृहात झाली शिवगर्जना, तर काही ठिकाणी म्हटले गेले श्लोक

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' या चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 18 फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलेल्या या चित्रपटाचे हाऊसफुल शो पाहायला मिळत आहेत.

पावनखिंडीचा रक्तरंजीत शिवकालीन इतिहास पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे तर डोळ्यात पाणीही येतय. यातच चित्रपटगृहातील असाच एक प्रसंग सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. हा चित्रपट पाहताना एका तरुणाने चक्क शिवगर्जना दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहताना या तरुणाला शिवगर्जना देण्यापासून राहावलं नाही. 

तर दुसरीकडे काही ठिकाणी चित्रपटाची सांगता करताना श्लोक म्हटले जात आहेत. पंढरपूर, कोल्हापुर या ठिकाणी तर या चित्रपटाची सांगता करत असताना श्लोक म्हटले जात असल्याचे व्हिडीओही चर्चेत आले आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive