By  
on  

'देवमाणूस 2' मालिकेत येणार हे विलक्षण वळण

 देवमाणूस या मालिकेला अगदी पहिल्या पर्वापासूनच पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात एक वेगळी कहाणी पाहायला मिळतेय. यात मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. या मालिकेत आता विलक्षण वळण आलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नुकतच या मालिकेत डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता हे दोघं मिळून विविध डाव आखणार असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र इतक्यातच मालिकेत एका नव्या चेहऱ्याची एन्टी झाली. सोनाली हे नवं पात्र या मालिकेत पाहायला मिळालं.

सोनाली ही डॉक्टरकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते.  जिथे मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून निसटू देत नाहीत. तेव्हा डॉक्टर आणि डिंपल एकत्र आल्यानंतर या मालिकेत या नव्या पात्राने वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत पुढे काय होईल हे आगामी भागात समोर येईल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive