By  
on  

या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार वैभव तत्त्ववादी

मराठीसह हिंदीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा एका हिंदी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'निर्मल पाठक की घर वापसी'  या सिरीजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

वैभवने नुकतच सोशल मिडीयावर याविषयीची माहिती शेयर केली आहे. या पोस्टमध्ये वैभव लिहीतो की, "निर्मल पाठक की घर वापसी... जेव्हा तुमच्या पात्राचे नाव हेच शीर्षकाचे नाव असते तेव्हा नेहमीच एक विशेष भावना असते. लवकरच येत आहे सोनी लिव्हवर."

तेव्हा हा निर्मल पाठक कसा असेल ? काय असेल या सिरीजचं आकर्षण हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

मराठी चित्रपट, मालिकांमध्ये विविध काम करणाऱ्या वैभवचं हिंदीतील काम कायमच लक्षवेधी ठरलय. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील चिमाजी अप्पाच्या भूमिकेतील त्याचं काम लक्षवेधी ठरलं होतं. शिवाय अनेक हिंदी प्रोजेक्टचा तो भाग झालाय. पाँडिचेरी हा त्याचा मराठी सिनेमाही नुकताच प्रदर्शित झालाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive