By  
on  

पाहा Video : 'काचा बादाम'वर माधुरी दीक्षितसोबत थिरकला हा अभिनेता

सोशल मिडीयावर विविध गाणी आणि रिल्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग असतात. यात एका गाण्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते गाणं म्हणजे काचा बदाम. हे गाणच नाही तर या गाण्यावर खास स्टेप्स करून डान्स व्हिडीओज करण्यात आले. अजूनही हे गाणं आणि या गाण्यावरचा डान्स सोशल मिडीयावर ट्रेंडिंग आहे. यातच आता या गाण्यावर चक्क धकधक गर्ल माधुरी दीक्षितने डान्स केलाय. 

माधुरीने सोशल मिडीया नुकताच एक डान्स व्हिडीओ शेयर केलाय. काचा बादाम या गाण्यावर माधुरीचा धमाकेदार डान्स या व्हिडीओत पाहायला मिळतोय. एवढच नाही तर या व्हिडीओत माधुरीसोबत थिरकतोय एक प्रसिद्ध अभिनेता.

 

हा अभिनेता आहे रितेश देशमुख. रितेश आणि माधुरीने काचा बादामवर जबरदस्त डान्स केलाय. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मि़डीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओच्या शेवटी माधुरीचा एक खास ठुमकाही पाहायला मिळतोय. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्षं वेधून घेतलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive