By  
on  

पाहा Photos : भाडिपाच्या 'भाड्याचे अवॉर्ड्स'साठी रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी

भाडिपा म्हणजेच भारतीय डिजीटल पार्टीच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम कॉन्टेन्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. यातच या भाडिपाचा वर्धापनदीन साजरा करण्यासाठी खास 'भाड्याचे अवॉर्ड्स'चे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.

भाडिपाचे सारंग साठ्ये, पॉला मॅग्लिन आणि त्यांच्या टीमने मिळून हे खास थिम अवॉर्ड प्लॅन केले होते. लवकरच हा खास अवॉर्ड सोहळा प्रसारित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर उपस्थित होते. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, प्रिया बापट, उमेश कामत, स्पृहा जोशी, गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे, नेहा शितोळे, नचिकेत पूर्णपत्रे, सुव्रत जोशी, सखी गोखले, सोनाली कुलकर्णी, स्वानंदी टिकेकर, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, मृण्मयी गोडबोले, गिरीज ओक, मोहन आगाशे या कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. सोशल मिडीया सन्सेशन यशराज मुखातेसह अनेक इन्फ्लुएन्सर यावेळी हजर होते.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive