By  
on  

अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि निरज यांना झालं कन्यारत्न, ठेवलं हे नाव

अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार असल्याचं तिने सोशल मिडीयावर सांगितलं होतं. मात्र मृणालने दिलेल्या खास बातमीने तिच्या चाहत्यांना आनंद झालाय.

मृणाल दुसानिसला कन्यारत्न झाल्याचं तिने सोशल मिडीयावर शेयर केलय. मृणालने या पोस्टमध्ये तिचा आणि निरजसोबत बाळाच्या हाताचा फोटो शेयर केलाय. 24 मार्च रोजी मृणाल आणि निरजच्या आयुष्यात या गोंडस बाळाने एन्ट्री केली आहे. शिवाय या बाळाचे नाव नूर्वी असे ठेवण्यात आलय.

 

मृणाल पोस्टमध्ये लिहीते की, "बाबांची लहान मुलगी आणि आईचं सर्वस्व, आमची छोटी राजकुमारी आली, नूर्वी..."या राजकुमारीच्या येण्याने मृणाल आणि निरजच्या संसारातील आनंद द्विगुणीत झालाय यात शंका नाही. 

मृणालने आत्तापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र 2016 मध्ये इंजिनियर निरज मोरेसोबत तिने लगीनगाठ बांधली. लग्नानंत मृणाल अमेरिकेत वास्तव्यात आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive