By  
on  

Gudhipadwa 2022 : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कलाकारांनी केले हे खास ट्रेडिशनल लुक

गुढीपाडव्याच्या सणाचा आनंद आणि उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळतोय. पारंपारिक वेशभुषेत नटून थटून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येतय. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारांचा उत्साही प्रत्येक सणाच्या निमित्ताने पाहायला मिळतो. सोशल मिडीयावर या सेलिब्रिटींनी दिलेल्या शुभेच्छा, पारंपरिक वेशभुषेतील त्यांचे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे या नवविवाहीत जोडप्याचा लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा आहे. यानिमित्ताने त्यांचा पारंपारिक थाट पाहायला मिळाला. आयुषीने लाल रंगाची साडी तर सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन आजचा सण साजरा करतायत. 

तर बिग बॉस मराठीमधून चर्चेत आलेली अभिनेत्री सई लोकूरने खास पारंपारिक वेशभुषा केलीय. खणाची निळ्या रंगाची साडी, नथ, चंद्रकोर आणि हातात गुढी असा खास लुक तिने सोशल मिडीयावर शेयर केलाय.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेदेखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास ट्रेडिशनल फोटो शेयर केलाय.

अभिनेत्री सायली संजीवने पैठणी आणि नथ परिधान करून खास फोटो शेयर केलाय.

दिग्दर्शक रवी जाधव यांनीदेखील पत्निसोबतचा पारंपारिक वेशभुषेतील गुढीसोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि पत्नि मिताली मयेकर या जोडप्यानेही खास ट्रेडिशनल लुकमधील फोटो शेयर केले आहेत. 

यासह अनेक कलाकारांचा आज पारंपारिक वेशभुषेतील लुक असलेले फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive