By  
on  

एनिमेटेड व्हिडीओ असलेल्या या गाण्यात झळकतायत सचिन पिळगावकर

अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या धनगर राजा या गाण्याचा एनिमिटेड व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय' नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकर यांनी गायली होती आणि म्हणूनच अल्बम देखील 'सचिनमय' या नावानेच रिलीज केला गेला. या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. ही सगळीच गाणी ही लोकसंगीताचा बाज असलेली पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं होतं.

या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं 'धनगर राजा' हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हंणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडिओ स्वरूपात आणलय. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या गाण्याचा अँनिमेटेड  व्हिडिओ सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेल वर रिलीज करण्यात आलाय. मराठी मधील हा बहुतेक पहिलाच संपूर्ण अँनिमेटेड म्युझिक व्हिडीओ असेल.

सचिन पिळगावकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रत्यय त्यांच्या गाण्यातून दिला आहे. 'सचिनमय' या अल्बम मधील सर्वच गाणी ही लोकगीताच्या बाजाची आहेत. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive