By  
on  

"मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा...", निळूभाऊंसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

 

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टी गाजवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता. आजही त्यांच्या अभिनयामुळे मनोरंजन विश्वात त्यांच्या नावाचं एक वेगळं स्थान आहे. याच निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपट येणार आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत.

निळू फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मिडीयावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. यातच प्रसाद ओक यांनी निळू फुले यांच्यासोबतचा आठवणीतला जुना फोटो शेयर करुन खास आठवण शेयर केली आहे. 

प्रसाद या पोस्टमध्ये लिहीतात की, "निळूभाऊ. आज तुमचा वाढदिवस.!तुमच्याकडून बरंच काही शिकलो. तुम्हाला मनोमन "गुरु" च मानलं. तुमचा आशीर्वाद म्हणून तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे.तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल.! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ..!!"

तेव्हा एक शिष्य म्हणून प्रसाद ओक यांची हा जीवनपट म्हणजे निळू फुले यांच्यासाठी गुरुदक्षिणा असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलय. मात्र या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका कोण साकारणार ? कसा असेल हा चित्रपट हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive