By  
on  

नात्यांची गोष्ट सांगणार 'एका हाताचं अंतर', झळकणार हे कलाकार

एका हाताचं अंतर या नव्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडलाय. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात  गौरी नलावडे, अभिजीत खांडकेकर, नेहा जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रेशम श्रीवर्धनकर हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण पाँडिचेरी येथे करण्यात येईल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश कुंटे सांगतात की, "प्लॅनेट मराठी सोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. तर काही कलाकारांसोबतही मी पहिल्यांदाच काम करत आहे. हे सगळेच कलाकार कमाल आहेत. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी असून कुटूंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. नात्यातील विविध पैलू यात पाहायला मिळणार आहेत.’’

‘प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात की, "प्रकाश कुंटे हे अतिशय उत्कृष्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेसृष्टीला नेहमीच वेगवेगळे विषय दिले असून प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लवकरच एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. यापूर्वी आम्ही 'पाँडीचेरी' हा चित्रपट केला होता ज्याचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात आले होते. आता 'एका हाताचं अंतर' या चित्रपटाचे चित्रीकरणही पाँडीचेरीमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आता एक नवीन चित्रीकरणस्थळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीही महाराष्ट्राबाहेर आपला ठसा उमटवू पाहात आहे.''

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive