By  
on  

पाहा Video : "ज्यांना डान्स येत नाही अश्यांना पण डान्स करावासा वाटतो", म्हणत अमृतासोबत थिरकली या अभिनेत्याची पत्नी

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रा ही भूमिका साकारतेय. विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतच या चित्रपटाचं चंद्रा हे गाणं प्रदर्शित झालय. एवढच नाही तर या गाण्यातील अमृताच्या स्टेप्सही चर्चेत आल्या आहेत. 

सोशल मिडीयावर चंद्रा या गाण्यावर डान्स व्हिडीओ करण्यात येत आहेत. शिवाय अमृतानेही या गाण्यावर खास व्हिडीओ तयार केलाय. अनेक कार्यक्रमांमध्येही अमृता चंद्राच्या गाण्यावर थिरकताना दिसतेय. मात्र अमृताचा एक व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओत फक्त अमृताच नाही तर सोबत आहे मंजिरी ओक. मंजिरी या उद्योजिका असून प्रसाद ओक यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम पाहतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या छोट्या उद्योजकांना सहकार्य करण्याचं काम करतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

 

मात्र अमृतासोबत त्यांनी या व्हिडीओत तिला छान साथ देत चंद्रा गाण्यावर ठेका धरला आहे. सोशल मिडीयावर मंजिरी यांचे फोटोशूटही चर्चेत असतात. 

अमृताला सुंदर डान्स करताना पाहुन त्यांनाही राहावलं नाही. त्यांनीही अमृतासोबत उत्तम डान्स केलाय. शिवाय नृत्यदिग्दर्शक आशीष पाटीलला याचं श्रेय दिलय. त्या पोस्टमध्ये लिहीतात की, "अमृता तुझा डान्स बघुन ज्यांना डान्स येत नाही अश्यांना पण डान्स करावसा वाटतो ही तुझ्या डान्सची जादू आहे .  (मी त्यातलिच एक) आशीष आणि तू जादूगार आहेस.. तू कुणालाही नाचवू शकतोस (मी त्यातलीच एक)"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive