By  
on  

पाहा Video : विशाल निकमने चक्क या अभिनेत्रीसोबत केला डान्स

बिग बॉस मराठीचं यंदाचं तिसरं पर्वही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं. विशाल निकमने तिसऱ्या सिझनची ट्रॉफी जिंकली. तर त्यासोबतच ए आणि बी टीम मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली. बिग बॉस मराठीच्या घरात या स्पर्धकांचे वाद विवाद दिसले मात्र घराबाहेर आल्यावर आता या कलाकारांमध्ये चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळतय. याचं ताजं उदाहरण म्हणजे विशाल निकमने नुकताच पोस्ट केलेला डान्स व्हिडीओ.

विशाल हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. यात तो त्याचे विविध फोट, व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. मात्र विशालने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. या व्हिडीओत विशाल एका अभिनेत्रीसोबत डान्स करताना दिसतोय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे बिग बॉस मराठी 3 मध्ये दिसलेली स्पर्धक मीरा जगन्नाथ. 

 

बिग बॉस मराठीच्या घरात मीरा आणि विशालमध्ये वाद होताना दिसले होते. मात्र घराबाहेर आल्यावर या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाल्याचं पाहायला मिळतय. दोघांनी या व्हिडीओत धमाल डान्स केलाय. मॉर्निंग डान्स म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करताना नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. त्यामुळे हा व्हिडीओ अधीकच व्हायरल होताना दिसतोय. 

सध्या विशाल हा 'आई मायेचं कवच' या मालिकेत मनासिंग ही नकारात्मक भूमिका साकारताना दिसतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive