पाहा Photos : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, शेयर केली गुड न्यूज

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका कमी कालावधीतच लक्षवेधी ठरली. सध्या मालिकेत दाखवण्यात येणारे विविध ट्विस्टही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. यातच या मालिकेतील एका अभिनेत्रीने खास गुड न्यूज शेयर केली आहे. या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोडने ही न्यूज शेयर केलीय.

मिनाक्षी ही प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार असल्याचं तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलय. सोशल मिडीयावर तिने डोहाळे जेवण कार्यक्रमाचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये मिनाक्षी छान नटून थटून, फुलांचे दागिने घातलेली पाहायला मिळतेय. मिनाक्षीसोबत तिचा पतीही या फोटोत दिसतोय. 

मिनाक्षी ही अभिनेता कैलाश वाघमारेची पत्नी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रात विविध भूमिकांमधून झळकतात. कैलास हा विविध नाटक, चित्रपटांमधून लक्ष वेधतोय. तर मिनाक्षीने देवकीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Recommended

Loading...
Share